Ad will apear here
Next
‘नवीन उद्योगांसाठीचे झोनिंग अॅटलास आवश्यकच’
डॉ. माधव गाडगीळ यांचे मत
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) सातव्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेले  कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अमिताव मलिक,पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. विजय केळकर.

पुणे : ‘कोणत्याही जिल्ह्यात नवीन उद्योगांची आखणी करण्यापूर्वी त्या जिल्ह्यातील उद्योगांसाठीचा ‘झोनिंग अॅटलास’ लक्षात घेणे आवश्यक ठरते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बहुतेक सर्व जिल्ह्यांसाठी हे अहवाल बनवले आहेत ;परंतु माझ्या माहितीनुसार हे अहवाल दडपले गेले असून, ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे’, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

डॉ. माधव गाडगीळ
पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात ‘पीआयसी’च्या वतीने संस्थेच्या सातव्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. गाडगीळ बोलत होते. या वेळी डॉ. गाडगीळ यांनी ‘आजचे केरळ, उद्याचे कोकण?’ या विषयावर आपली मते मांडली.

पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अमिताव मलिक, मानद संचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने या वेळी www.climatecollectivepune.org या पर्यावरण विषयक वेबसाईटचे अनावरणही गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा विरोध डावलूनदेखील विविध प्रकल्प प्रस्तावित केले जात आहेत. हे योग्य नसून, उद्योगांसाठीच्या झोनिंग अॅटलासचे अहवाल नागरिकांसमोर खुले व्हावेत यासाठी दबाव आणायला हवा. अमेरिकन अर्थतज्ज्ञ लॅरी समर्स म्हणाले होते की, ज्या देशात गरिबी आहे त्या देशात विषारी प्रकल्प उभारावेत. याचा गर्भित अर्थ असा की त्या देशातील नागरिकांचे जीवन स्वस्त आहे. विषारी प्रकल्प देशात येत असून, ही काळजी करण्याजोगी बाब आहे.’

विकासाच्या नावाखाली आणले जाणारे प्रकल्प, या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढतील अशी दाखवली जाणारी स्वप्ने आणि अनेक उद्योगांचे विषारीस्वरूप याबाबत अनेक उदाहरणे देऊन ते म्हणाले, ‘ही परिस्थिती बदलण्यासाठी कायद्यांची योग्य अंमलबजावणी व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत काम करणे महत्त्वाचे आहे.’

‘केरळमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीनंतर पुर्नविकासाच्या कामात स्थानिक महिला बचत गटांची मदत सरकारला होऊ शकते. कुटुंबश्री हा महिला बचत गट केरळमध्ये सामान्य महिलांशी जोडलेला असून, त्यांच्या मदतीने हे शक्य आहे. अर्थात यासाठी योग्य नियोजन करीत काम करणे गरजेचे आहे’, असेही डॉ. गाडगीळ या वेळी म्हणाले. 

‘सध्या अणुउर्जा ही सौरउर्जेच्या तुलनेने महाग झाली असून, आर्थिकदृष्ट्यादेखील तो चांगला पर्याय राहिलेला नाही.जैतापूरला मच्छीमारांशी चर्चा करण्यासाठी जाताना आपल्याला संपूर्ण आयुष्यात प्रथमच पोलिसांनी अडविले होते’,अशी आठवणही त्यांनी सांगितली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZJZBS
Similar Posts
‘हवामानबदल साक्षरतेची चळवळ बनावी’ पुणे : ‘हवामानबदलाचे परिणाम दिसण्यास सुरूवात आली असून, कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढण्यासारख्या गोष्टींमध्ये बदलाचा वेग काळजी करण्याजोगा आहे. हवामानबदलाविषयी साक्षरता निर्माण करणे ही एक चळवळ बनायला हवी,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले
श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे पुण्यात आयोजन पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) १० ते १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत लॉ कोलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे श्रीलंकन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीआयसी’ने आयोजित केलेला हा सलग ११वा चित्रपट महोत्सव आहे.
‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’ पुणे : ‘चित्रपट माध्यमातून भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत’, असे मत इस्रायलचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथाकार डॅन वॉलमन यांनी व्यक्त केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ तर्फे (पीआयसी) आयोजित करण्यात आलेल्या इस्रायली चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॅन वॉलमन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते
‘आर्थिक क्षेत्राला पूरक सेवा व्यवस्थांचे जाळे आवश्यक’ पुणे : ‘जगामध्ये आर्थिक परिस्थिती बदलाचे वारे सध्या वाहत आहेत, त्यामुळे भारत आणि प्रामुख्याने दक्षिण आशियायी देशांनी ही संधी लक्षात घेत व्यापक सुधारणा करण्याची गरज आहे. ही सुधारणा करीत असताना आर्थिक क्षेत्राला पूरक सेवा देणाऱ्या व्यवस्थांचे जाळे निर्माण करणे महत्त्वाचे आहे’, असे मत वर्ल्ड बँकेचे भारतातील संचालक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language